Gutkha Banned In Up Assembly Premises : उत्तरप्रदेश विधानसभा परिसरात पान मसाला आणि गुटखा यांवर बंदी !

पान मसाला खातांना आढळणार्‍यास १ सहस्र रुपयांचा होणार दंड

उत्तरप्रदेशाचे विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशाच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी सभागृहात एका आमदाराकडून पान मसाला खाऊन थुंकला होता. या प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी सर्व आमदारांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. थुंकणार्‍या संबंधित आमदारालाही त्यांनी कक्षामध्ये बोलावले होते. या घटनेनंतर विधानसभेने पान मसाला आणि गुटखा यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच विधानसभेच्या परिसरात यांचे सेवन करतांना आढळणार्‍याकडून १ सहस्र रुपये दंड आकारला जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

जनतेला विशेषतः युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या अशा पदार्थांच्या  उत्पादनावरच सरकार बंदी का घालत नाही ?