Iftar Party At British Parliament : ब्रिटनची संसद आणि राजघराण्याचा प्राचीन किल्ला येथे प्रथमच आयोजित करण्यात आली इफ्तारची मेजवानी !

(इफ्तार म्हणजे मुसलमानांचे रमझानच्या काळात उपवास सोडणे)

लंडन (ब्रिटन) – रमजानच्या निमित्ताने ४ मार्च या दिवशी ब्रिटन संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये प्रथमच इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तारमध्ये इमामांनी अरबी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये जमावाला संबोधित केले. या  प्रसंगी ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टार्मर उपस्थित होते. ते म्हणाले, ‘गाझामध्ये चालू असलेल्या संघर्षामुळे ब्रिटनमधील मुसलमानांना अडचणी येत आहेत. ब्रिटनमधील मुसलमानांसाठी हा काळ गाझा संघर्ष आणि पॅलेस्टिनींच्या दुःख यांमुळे कठीण होता.’ (ब्रिटनच्या पंतप्रधानांना हमासच्या आक्रमणात ठार झालेल्या  इस्रायली नागरिकांच्या कुटुंबियांसाठी दुःख वाटत नाही का ? – संपादक) या वेळी पंतप्रधानांनी मुसलमानांसमवेत एकता व्यक्त केली आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. संसदेच्या सर्वपक्षीय गटाने ‘द बिग इफ्तार’ या शीर्षकाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ब्रिटनच्या राजघराण्याकडून प्राचीन ‘विंडसर कॅसल’ येथे इफ्तारचे आयोजन

२ मार्च २०२५ या दिवशी ब्रिटनच्या राजघराण्याचा प्राचीन किल्ला ‘विंडसर कॅसल’ येथेही इफ्तारची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या किल्ल्याच्या १ सहस्र वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. या कार्यक्रमाला ३५० हून अधिक पाहुण्ो उपस्थित होते. हा कार्यक्रम ब्रिटनचे राजे चार्लस् तृतीय यांनी आयोजित केला होता. ते स्वतः या वेळी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत घट होऊन मुसलमानांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने तेथेही राजकारण्यांकडून मुसलमानांचे लांगूलचालन केले जात आहे आणि ही घटना त्याचेच निदर्शक आहे !