डेहराडूनमध्ये ११ बेकायदेशीर मदरशांना ठोकण्यात आले टाळे !

डेहराडून (उत्तराखंड) – येथील ११ बेकायदेशीर मदरशांना प्रशासनाने टाळे ठोकले आहे. संपूर्ण राज्यांत अशा ५०० हून अधिक मदरशांची ओळख पटवण्यात आली आहे, ज्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदेशीर मदरशांना टाळे ठोकण्याचा आदेश २८ फेब्रुवारीला देण्यात आल्यानंतर मान्यता मिळवण्यासाठी उत्तराखंड मदरसा बोर्डाकडे सुमारे ८८ अर्ज आले. बोर्डाने आतापर्यंत यांपैकी ५१ मदरशांना मान्यता दिली आहे.
(म्हणे) ‘मदरसा चालवण्यासाठी कोणत्याही मान्यतेची आवश्यकता नाही !’ – मुस्लिम सेवा संघटनामुस्लिम सेवा संघटनेचे अध्यक्ष नईम कुरेशी म्हणाले की, मदरसा चालवण्यासाठी कोणत्याही मान्यतेची आवश्यकता नाही. मदरशांना टाळे ठोकण्यापूर्वी व्यवस्थापकांना कोणताही आदेश किंवा सूचना देण्यात आली नसल्याने कारवाई करणे बेकायदेशीर आहे. जर ही बेकायदेशीर कारवाई थांबवली नाही, तर आम्ही सचिवालयाबाहेर निषेध करू. (मुसलमान संघटनांना देशात त्यांचेच राज्य आहे, अशा आविर्भावात बोलत आहेत. अशा कायदाद्रोही संघटनेवर बंदी घालून तिच्या सर्व पदाधिकार्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|