‘श्री गणपतीचे ‘विडंबनात्मक चित्र’ आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक, ‘सर्वसाधारण चित्र’ थोडे लाभदायक आणि ‘सनातन-निर्मित सात्त्विक चित्र’ पुष्कळ लाभदायक असणे

श्री गणपतीचे विडंबनात्मक चित्र, सर्वसाधारण चित्र आणि सनातन-निर्मित सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

नेपाळच्या भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याची घटना उघड करणार्‍या नेपाळी पत्रकाराचा रहस्यमयरित्या मृत्यू

नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार बलराम बनिया यांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला आहे. ते येथील ‘कांतीपूर डेली’ नावाच्या दैनिकाचे साहाय्यक संपादक होते. १० ऑगस्ट या दिवशी ते अचानक बेपत्ता झाले आणि १२ ऑगस्टला त्यांचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला.

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’ शिवाय भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या दोन शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले.

सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहातील बंदीवान राजेश गावकर यांच्या मृत्यूच्या प्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांना अटक

‘सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील बंदीवान राजेश गावकर याच्या मृत्यूच्या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद असलेले कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक योगेश पाटील यांना २.८.२०२० या दिवशी सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने नागपूर येथून अटक केली.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्‍वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बागपत (उत्तरप्रदेश) येथील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

बागपत (उत्तरप्रदेश) येथे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आक्रमण करणारे तिघे जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सक्षम भारत !

जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मागील मासात ‘डिस्कव्हरी’ वाहिनीच्या एका कार्यक्रमात भारताचे कौतुक करतांना म्हटले, ‘‘भारताकडे संपूर्ण विश्‍वाला कोरोनाची लस पुरवण्याची क्षमता आहे. भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत न्यून असूनही भारताने लसीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काम केले आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

अमेरिकेत शिक्षण घेणारी आणि सध्या घरी आलेली येथील सुदीक्षा भाटी हिचा टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. गरीब कुटुंबातील असलेल्या सुदीक्षा हिने अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळवली होती आणि तेथे ती शिकत होती.