सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहातील बंदीवान राजेश गावकर यांच्या मृत्यूच्या प्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांना अटक

‘सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील बंदीवान राजेश गावकर याच्या मृत्यूच्या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद असलेले कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक योगेश पाटील यांना २.८.२०२० या दिवशी सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने नागपूर येथून अटक केली. या प्रकरणातील एक संशयित सुभेदार झिलबा पांढरमिसे यांनाही अटक करण्यात आली आहे. बंदीवान गावकर याच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती; मात्र मृत्यूपूर्वी ‘घायाळ अवस्थेत असलेल्या गावकर याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे’, असे अन्य बंदीवानांनी सांगितले होते, तरीही त्याच्यावर उपचार झाले नाहीत. यातच गावकर याचा मृत्यू झाला. त्यानंतर अन्य कैद्यांनी कारागृहात उपोषण केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयाला कळवा.