‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

१५ ऑगस्ट या दिवशी भारताचा ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. यानिमित्ताने…

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’ शिवाय भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या दोन शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो एक मूलमंत्रच झाला ! ‘वन्दे मातरम्’ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतका प्रेरक मंत्र होता की, मादाम कामा यांनी ‘वन्दे मातरम्’ या शब्दांना भारताच्या नियोजित राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी ठळकपणे स्थान दिले आणि तो राष्ट्रध्वज वर्ष १९०७ मध्ये बर्लिन येथे फडकवला. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत आजही, म्हणजे ते रचल्यानंतर १५१ वर्षांनीही राष्ट्राभिमान्यांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती, भारतभूमीविषयी असामान्य प्रेम निर्माण करण्यात सिंहाची भूमिका निभावते.

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ११.८.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

सौ. मधुरा धनंजय कर्वे

१. चाचणीचे स्वरूप

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या चाचणीत २ साधिका सहभागी झाल्या होत्या. चाचणीतील पहिल्या साधिकेला आध्यात्मिक त्रास (टीप) आहे, तर दुसर्‍या साधिकेला आध्यात्मिक त्रास नाही. दोन्ही साधिकांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणण्यापूर्वी आणि म्हटल्यानंतर त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे : आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांच्यामध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ अनुक्रमे १.१० मीटर अन् १.२२ मीटर होती. त्या दोघींनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे, तर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होणे

टीप – आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा नव्हती. तिने ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिची प्रभावळ १.७१ मीटर होती.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होणे अन् त्यामागील कारणमीमांसा

३ अ १. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संस्कृत भाषेमध्ये असल्याने, तसेच त्यात मातृभूमीला वंदन आणि तिची स्तुती असल्याने या गीतामध्ये शक्ती अन् चैतन्य असणे : संस्कृत ही विश्‍वातील सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे. सात्त्विक भाषेतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. राष्ट्रभक्त बंकीमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संस्कृत भाषेमध्ये असल्याने, तसेच त्यात मातृभूमीला वंदन आणि तिची स्तुती असल्याने त्यात शक्ती आणि चैतन्य आहे. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणतांना मातृभूमीविषयी प्रेम आणि आदर निर्माण होतो. त्यामुळे गाणार्‍यामध्ये राष्ट्राविषयीची अस्मिता वाढून राष्ट्रनिष्ठा प्रबळ होते.

चाचणीतील साधिकांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यामुळे त्यांना गीतातील शक्ती आणि चैतन्य याचा लाभ झाला. त्यामुळे दोन्ही साधिकांना ‘त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे, त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे वा तिच्यामध्ये वाढ होणे आणि त्यांची एकूण प्रभावळ वाढणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३१.५.२०१९)

ई-मेल : [email protected]

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्याहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.