लाखो गणेशमूर्ती सिद्ध झाल्या असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदीचा निर्णय पुढे ढकलावा ! – पेण (रायगड) येथील मूर्तीकारांची मागणी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आगामी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर घातलेली बंदी आणि अन्य अनेक निर्बंध, यांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक मूर्तीकारांना फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मूर्तीकारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.