मोज्यांवर श्री गणेशाचे चित्र छापून विडंबन करणार्‍या अमेरिकेतील उत्पादकाने क्षमा मागत उत्पादनाची विक्री थांबवली !

विदेशातील हिंदूंनी निषेध नोंदवल्याचा परिणाम ! भारतातील हिंदूंनी विरोध केल्यावर येथील किती आस्थापने देवतांचा अवमान करणार्‍या उत्पादनांची त्वरित विक्री थांबवतात !

अमेरिकेतील आस्थापनाद्वारे मोज्यांवर श्री गणेशाचे चित्र छापून विडंबन

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील सांताक्रूझ येथील ‘मर्ज ४’, या मोजे उत्पादन करणार्‍या आस्थापनाने श्री गणेशाचे चित्र असलेल्या मोज्यांचे उत्पादन करून ते विक्रीस ठेवले आहेत.

राज्यस्तरीय ‘श्री गणेश अथर्वशीर्ष पठण’ पाठांतर स्पर्धेचे स्तोत्रांजली बालसंस्कारच्या वतीने आयोजन

विरार, मुंबई येथील ‘स्तोत्रांजली बालसंस्कार’ या संस्थेच्या वतीने २ सप्टेंबरला असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय ‘श्री गणेश अथर्वशीर्ष पठण’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा संपूर्ण राज्यात विविध शाळांमध्ये राबवली जाणार असून मान्यवर आणि अभ्यासू यांंचा यात समावेश आहे.

तमिळनाडूत स्थापन केलेल्या ‘क्रिकेट गणेश मंदिरा’त गणेशमूर्तींना खेळाडूंच्या रूपात दाखवले !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे देवतांचे मानवीकरण करणारे हिंदू ! सध्या ब्रिटनमध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा चालू आहे. स्वतःला गणेशभक्त समजणारे मूर्तीकार के.आर्. रामकृष्णन् यांनी या निमित्ताने रामकृष्णन् यांनी ‘क्रिकेट गणेश मंदिर’ उभारले आहे.

११ जुलैला बारभाई-नांगनूर येथे श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळा !

श्री कृपेने बारभाई-नांगनूर येथे नव्याने साकारलेल्या ओम गणेश मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध गणेश मंदिरातील मूर्तीला भाजपच्या झेंड्याचा रंग असणारे वस्त्र नेसवले

हिंदूंना तसेच, ‘हिंदुत्वनिष्ठ’ असल्याचे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना अन् कार्यकर्त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते ! धर्मशिक्षण नसणारे असे पक्ष कधीतरी हिंदुत्वाचे कार्य करू शकतील का ?

इंग्लंडच्या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून बिअरचे ‘गणेश’ असे नामकरण

इंग्लंडमधील ‘विशबोन ब्रूअरी लिमिटेड’ या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाने मॅनचेस्टरमध्ये आयोजित केलेल्या बिअरच्या एका कार्यक्रमात भारतीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी फळे आणि भाज्या यांच्यापासून बनवलेल्या बिअरला ‘गणेश’, असे नाव दिले.

गोरेगाव (मुंबई) येथे आजपासून १०० कुण्डीय श्री गणेश महालक्ष्मी महायज्ञाला प्रारंभ

स्वामी करपात्री फाऊंडेशनद्वारा यज्ञसम्राट वीरव्रती श्री प्रबलजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव (पश्‍चिम) येथील बांगुरनगर, विष्णु पार्क येथे विश्‍वकल्याणार्थ १०० कुण्डीय श्री गणेश महालक्ष्मी महायज्ञ आणि श्रीमद् वाल्मिकी रामकथा …….

गणेशमूर्तीची विटंबना केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक

कासेवाडीमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या काळात ट्रॅक्टरचालक, साऊंड मालक यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी, तसेच गणेशमूर्तीच्या दिशेने चप्पल, बूट आणि दगड भिरकावून मूर्तीची विटंबना केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि अन्य १५ जण यांना अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF