बागपत (उत्तरप्रदेश) येथील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

उत्तरप्रदेशमध्ये प्रतिदिन अशा घटना घडत आहेत आणि त्या रोखण्यास राज्याचे पोलीस अपयशी ठरले आहेत ! हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अधिकाधिक कठोर पावले उचलावीत !

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर

बागपत (उत्तरप्रदेश) – येथे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आक्रमण करणारे तिघे जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खोखर यांच्या हत्येविषयी शोक व्यक्त करून या घटनेची चौकशी करून आरोपींवर २४ घंट्यांत कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. या घटनेला कोण उत्तरदायी आहे ?, याचाही शोध घेण्यास सांगितले आहे. बागपतमध्ये जून मासामध्येच भाजपच्या एका नेत्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

(सौजन्य : NDTV)