बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे दर्शवणारी आणखी एक घटना !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – अमेरिकेत शिक्षण घेणारी आणि सध्या घरी आलेली येथील सुदीक्षा भाटी हिचा टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. गरीब कुटुंबातील असलेल्या सुदीक्षा हिने अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळवली होती आणि तेथे ती शिकत होती. कोरोनामुळे ती घरी परतली होती. स्वतःच्या काकांसमवेत दुचाकीवरून जात असतांना अन्य दुचाकींवरून आलेल्या काही टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग करत सुदीक्षा हिची छेड काढणे चालू केले. तेव्हा या दुचाकीचा अपघात होऊन त्यात तिचा मृत्यू झाला.