Police Stabbed : एका कैद्याने कृष्णवर्णियाची हत्या करणार्‍या पोलिसाला कारागृहात २२ वेळा भोसकले !

अ‍ॅरिझोना येथील टक्सन कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांच्यावर एका कैद्याने जीवघेणे आक्रमण केले. जॉन टर्सकन या ५२ वर्षीय कैद्याने चौविन यांना २२ वेळा चाकूने भोसकले.

फाशीच्या शिक्षेतून कतारमधील भारतियांना वाचवण्यासाठी भारताचे प्रयत्न !

‘काही वर्षांपासून भारताचे माजी नौदल अधिकारी हे कतारच्या करागृहात आहेत. त्यांना अलीकडेच कतारने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

खोटे किंवा सूड उगवण्यासाठी बलात्कारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पीडितेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय

बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले.

प्रियकराला स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची संमती देणार्‍या महिलेला ४० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

थिरूवनंतपूरम् येथील जलद गती न्यायालयाने प्रियकराला स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू दिल्याच्या प्रकरणी एका महिलेला ४० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अशांना फाशीची शिक्षा होणारा कायदा करायला हवा !

वलसाड (गुजरात) येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी (वय ३४ वर्षे) याला श्री गणेशाविषयी अश्लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

जाजपूर (ओडिशा) येथील शाळेत उठाबशा काढण्याची शिक्षा केल्यामुळे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

जाजपूर येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गातील एका मुलाला शिक्षा म्हणून उठाबशा काढण्यास सांगण्यात आले होते. उठाबशा काढतांना हा मुलगा बेशुद्ध पडला.

न्यायालयात ३० मिनिटे विलंबाने पोचणार्‍या पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा !

परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि हेड कॉन्स्टेबल सुट्टीकालीन न्यायालयात ३० मिनिटे विलंबाने पोचले. या प्रकरणी शिस्तभंगाचा ठपका ठेवत दोघांना परिसरातील गवत छाटण्याचे काम देण्यात आले.

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करता येणार नाही ! – मुख्य निवडणूक अधिकारी, गोवा

या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांना ६ मास कारावास किंवा ५ सहस्र रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

सांगली जिल्‍ह्यात गेल्‍या ५ वर्षांत ३१ विभागांतील १५२ जणांना लाचखोरीच्‍या प्रकरणी अटक !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगली जिल्‍ह्यात गेल्‍या ५ वर्षांत ३१ विभागांतील १५२ जणांना लाचखोरीप्रकरणी अटक केली आहे. सर्व विभागांत लाच घेण्‍यात महसूल विभाग आघाडीवर असून यातील ५२ जणांना अटक करण्‍यात आली होती.

अटक करण्यात येणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव !

भारत भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी कठोर कायदे, जलद गतीने मिळणारी कठोर शिक्षा आणि जनतेकडून साधना करवून घेणे, हेच योग्य उपाय होत !