कोल्लम (केरळ) – येथे १५ जून २०१६ या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी कोल्लम जिल्हा न्यायालयाने ३ जणांना दोषी ठरवले आहे. अब्बास अली, शमसन करीम राजा आणि दाऊद सुलेमान अशी त्यांची नावे आहेत. अन्य एकाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दोषी आढळलेले सर्व तमिळनाडूतील मदुराईचे रहिवासी आहेत.
या घटनेत कोल्लम जिल्हाधिकारी कार्यालयात उभी असलेली जीप स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्यात आली होती. या स्फोटात ६१ वर्षीय व्यक्ती घायाळ झाली होती. या घटनेनंतर राज्यभरात साखळी बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आल्याचे अन्वेषणात उघड झाले होते.
पोलिसांनी स्फोटाच्या ठिकाणाहून १५ बॅटरी, १७ फ्यूज, वायर आणि एक बॅग जप्त केली होती. तसेच या प्रकरणी एकूण ५ जणांना अटक केली. दोषी ठरलेल्या तिघांव्यतिरिक्त महंमद अयुब आणि शमशुद्दीन यांचाही समावेश आहे. ते अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचेही समोर आले होते.
संपादकीय भूमिकाअशांना फाशीचीच शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |