अटक करण्यात येणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव !

भारत भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी कठोर कायदे, जलद गतीने मिळणारी कठोर शिक्षा आणि जनतेकडून साधना करवून घेणे, हेच योग्य उपाय होत !

प्रेयसीची निर्घृण हत्या केल्यावरून १७ वर्षांचा कारावास भोगणार्‍या तरुणाची पुतिन यांनी केली सुटका !

अमेरिकेत प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या तरुणाची राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुटका केली. या तरुणाने युक्रेनविरोधातील युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुतिन यांनी त्याची सुटका केली आहे.

गोवा : मंदिरातील चोरीच्या प्रकरणी आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयाकडून कायम

श्री सतीदेवी मंदिरात १९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी दानपेटी फोडून आतील ११ सहस्र ८१० रुपये चोरीला गेले होते. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित सुदन याच्या विरोधात गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते.

इस्‍लामी देशांत भारतियांवर अन्‍याय !

कतारमधील अल् दाहरा आस्‍थापनातील ८ भारतीय कर्मचार्‍यांना स्‍थानिक न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी भारताच्‍या नौदलाचे माजी सैनिक आहेत. त्‍यांच्‍यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्‍याचा आरोप होता.

Qatar Death Sentence : भारतीय परराष्ट्र मंत्रालय कायदेशीर बाजूंचा करत आहे अभ्यास !

शिक्षा झालेल्या भारतियांवर इटलीकडून प्रगत पाणबुड्या खरेदी करण्याच्या कतारच्या गुप्त योजनेची माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप होता.

समजावादी पक्षाचे नेते आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलगा यांना प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावाची शिक्षा !

समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा स्थानिक न्यायालयाने केली आहे. मुलगा अब्दुल्ला याचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवल्याच्या प्रकरणी ही शिक्षा करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणार्‍या पित्याला आजन्म कारावासाची शिक्षा !

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने तिच्या वडिलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना ही घटना घडली होती.

बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणातील आतंकवाद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित !

‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही !

‘पोक्‍सो’ कायद्यांतर्गत आरोपीची शिक्षा कायम ठेवणारा मध्‍यप्रदेश उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग केल्‍याप्रकरणी आरोपीला ३ वर्षांची शिक्षा

विनाकारण व्यक्तीला ३० मिनिटे कोठडीत डांबणार्‍या पोलिसांना ५० सहस्र रुपयांचा दंड !

देहली उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयाने अशाच प्रकारच्या आणि याहून अधिक कठोर शिक्षा उद्दाम पोलिसांना केल्यास त्यांच्या थोडातरी पालट होईल, अशी अपेक्षा !