‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्या फैझान याला जामीन देतांना न्यायालयाची अट
भोपाळ (मध्यप्रदेश) – सार्वजनिक ठिकाणी ‘पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद’ अशी घोषणा देणार्या फैझान याला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने जामीन देतांना काही अटी घातल्या आहेत. त्यांनुसार त्याने महिन्यातून २ वेळा, अर्थात् प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत स्थानिक पोलीस स्थानकात हजेरी लावायची. या वेळी त्याने पोलीस ठाण्यावर फडकत असलेल्या राष्ट्रध्वजाला ‘सॅल्युट’ करायचा. हे करतांना २१ वेळा ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा द्यायची आणि हे सगळे खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत करत रहायचे आहे.
“Visit Police Station twice a month, salute National Flag and chant ‘Bharat Mata ki Jay’ 21 times” : Madhya Pradesh HC’s bail condition for Faizan who have slogans of ‘Pakistan Zindabad’
pic.twitter.com/QvELGBkHq5— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2024
याव्यतिरिक्त ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीला न्यायालयाने जामीन संमत केला. फैझान याने मे मासामध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. तेव्हा त्याला अटक करण्यात आली होती. त्या वेळेपासून तो कारागृहातच होता.

CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती