सांगली, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – विवाहितेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी पांडुरंग श्रीरंग केंगार याला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ सहस्र ५०० रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश श्रीमती एम्.एस्. काकडे यांनी सुनावली. सरकारच्या वतीने अधिवक्ता नितीन नरवाडकर यांनी काम पाहिले. (बलात्कार करणार्या सर्वांनाच अशी कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक) २६ ऑक्टोबर २०२० या दिवशी पीडित महिला ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्या वेळी केंगार दुचाकीवरून तेथे आला आणि त्या महिलेचे तोंड दाबून बळजोरीने गाडीवर बसवून वंजारवाडी येथील निर्जन स्थळावरील एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही आरोपीने २६ ते ३० ऑक्टोबर २०२० या कालावधीत अनेकदा पीडितेवर अत्याचार केले होते.