केरळमध्ये कम्युनिस्टांकडून योग शिबिराचे आयोजन

कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी ‘योगासने म्हणजे कुत्र्यासारख्या हालचाली’ असे विधान केले होते. आता त्याच कम्युनिस्टांच्या केरळमधील संघटनांनी योगाच्या प्रसारार्थ काही उपक्रम चालू केले आहेत.

नवी मुंबईत भगवेमय वातावरणात श्रीदुर्गामाता दौड

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवी मुंबईत दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात पार पडली. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ मूर्ती समोर महाराजांची आरती करून ही दौड चालू झाली.

देहली येथे संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय उपयोगी साहित्याचे विनामूल्य वाटप

संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने संगम विहार येथील ‘आस्था पब्लिक स्कूल’ या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले.

सांगलीच्या बालगायकांकडून संभाजीनगर येथे संस्कृत गीतरामायणाचे सादरीकरण ! 

सांगली येथील बाल गायकांनी संभाजीनगर येथे जगातील पहिला ५६ गाण्यांचा संस्कृत गीतरामायणाचा पूर्णोत्सव कार्यक्रम सादर केला.

कळंबोली येथे रणरागिणी शाखेकडून उपक्रमांचे आयोजन !

हिंदु जनजागृती समिती प्रणीत महिला शाखा रणरागिणीच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत येथील राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळ, शिवशाही गणेशोत्सव मित्रमंडळ, जोगचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव गीतांजली मित्र मंडळ, बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी उपक्रम घेण्यात आले.

ऋषिपंचमीच्या निमित्ताने ‘शारदा ज्ञानपीठम्’ च्या वतीने १४ ऋषितुल्य व्यक्तींचा सत्कार

विश्व शांती केंद्र (आळंदी), एम्आयटी डब्ल्यूपीयू आणि शारदा ज्ञानपीठम् यांच्या वतीने १४ ऋषितुल्य व्यक्तींचा सत्कार २६ ऑगस्टला करण्यात आला.

संतकृपा प्रतिष्ठानकडून दक्षिण देहली येथे वृक्षारोपण

संतकृपा प्रतिष्ठानकडून दक्षिण देहलीच्या कालकाजी येथील छडपूजा पार्क आणि राजीव गांधी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.

सांगलीत २२ ते २८ ऑगस्ट पू. अवधूत बाबा श्री शिवानंदजी यांचे शांभवी शिबीर ! – डॉ. अमित शुक्रे

शिवयोग ही जगातील सर्वांत मोठी संजीवनी विद्या (हिलींग) शिकवणारी संस्था आहे. ही विद्या पू. अवधूत बाबा श्री शिवानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवण्यात येते

उद्योजक भावेश भाटिया यांना वासुदेव जीवन-दृष्टी गौरव पुरस्कार प्रदान

अंधत्वावर मात करून यशस्वी उद्योजक बनलेले सनराईज कॅन्डल्सचे प्रमुख आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. भावेश भाटिया यांना वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने वासुदेव जीवन-दृष्टी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शेगाव येथे पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन

मराठी पत्रकार परिषद मुंबईचे ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन शेगाव येथे १९ आणि २० ऑगस्ट या दिवशी संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF