निवडणूक निकालानंतर अनधिकृत होर्डिंगमुळे नवी मुंबई शहराचे विद्रूपीकरण !

नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार !

अनधिकृत होर्डिंग लावणार्‍यांवर आयुक्त कायदेशीर कारवाई करतील का ?

नवी मुंबई – नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांची विज्ञापने शहरात मोठ्या प्रमाणात विनाअनुमती लावण्यात आली आहेत. यामुळे शहरात विद्रूपीकरण झाले आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही त्याला न जुमानता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावले आहेत.