गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्याचा आरंभ !

आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणार्या कार्तिक वारीस टाळ-मृदंगाचा निनाद आणि ब्रह्मवृंदांच्या अखंड मंत्रोच्चारात गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने आरंभ झाला. विधीवत पूजन झाल्यानंतर माऊलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा मालक यांच्या वतीने नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी पालखी सोहळा मालक ह.भ.प. बाळासाहेब आरफळकर, ह.भ.प. राजाभाऊ आरफळकर आदींसह आळंदीकर ग्रामस्थ आणि भाविकभक्त बहुसंख्येने उपस्थित होते. कार्तिक कृष्ण अष्टमी ते अमावस्येपर्यंत हा सोहळा चालणार आहे.
मुख्य कार्तिक एकादशीचा सोहळा मंगळवार, २६ नोव्हेंबरला होणार असून पवमान अभिषेक, महापूजा मध्यरात्री १२ नंतर चालू होईल. दुपारी १ वाजता पालखी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा मंदिरात प्रवेश करेल. बुधवारी द्वादशीला शासकीय पंचोपचार पूजा होऊन दुपारी रथोत्सव साजरा होईल. गुरुवारीही पवमान महापूजा होऊन सकाळी आणि सायंकाळी कीर्तन सेवा होईल आणि त्यानंतर मुख्य समाधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद