|
संभल (उत्तरप्रदेश) – येथे २४ नोव्हेंबरला श्री हरिहर मंदिराच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५ मुसलमानांचा मृत्यू झाला. नईम, बिलाल, रोमन, कैफ आणि अयान अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे. यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांनी येथे ध्वज संचलनही केले. येथे बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ‘लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये आणि संयम राखावा’, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई यांनी सांगितले की, हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.
शहरात शांतता, बहुतांश घरांना कुलूपे
हिंसाचारानंतर शहरातील बाजारपेठा आणि दुकाने पूर्णपणे बंद आहेत. हिंसाचार झाला, तर भागांतील बहुतांश घरांना बाहेरून कुलूपे आहे. पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून रस्त्यावर केवळ पोलीसच दिसत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार २५ नोव्हेंबरला शाळांना सुटी देण्यात आली होती. परिस्थिती तणावपूर्ण राहिल्यास शाळांच्या सुट्याही वाढवल्या जाऊ शकतात.
समाजवादी पक्षाचे खासदार आणि आमदाराचा मुलगा यांच्यावर गुन्हा नोंदया हिंसाचाराच्या प्रकरणी २ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. संभलमधील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क आणि समाजवादी पक्षाचेच स्थानिक आमदार इक्बाल महमूद यांचा मुलगा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांवर दंगलखोरांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह २ सहस्र ५०० जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातून हा हिंसाचार कुणी घडवून आणला हे लक्षात येते ! अशा पक्षावरच आता बंदी घालण्याची मागणी हिंदूंनी केली पाहिजे ! – संपादकीय भूमिका |