महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद येथे ३ दिवसांचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आणि सामूहिक नामजप पार पडला !

कार्यक्रमात शिवाचा सामूहिक नामजप करतांना एका महिला जिज्ञासूला ‘सामूहिक नामजप करतांना शिवाच्‍या चरणाशी बसले आहे’, असे तिला जाणवले.

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

झाडगाव (रत्नागिरी) येथे २३ फेब्रुवारीपासून वेदशाळा आणि संस्कृत पाठशाळेत धार्मिक कार्यक्रम

वेद आणि शास्त्र या विषयातील २ दिग्गज (कै.) विनायक आठल्येगुरुजी अन् व्याकरणाचार्य (कै.) पु.ना. फडकेशास्त्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झाडगाव येथील संस्कृत पाठशाळेमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन !

समस्त हिंदूंनी जातपात विसरून राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे ! – योगऋषी रामदेवबाबा

पतंजलि योगपीठ आणि श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि सनातन धर्मातील विविध घटक यांना संघटित करण्याचे महान कार्य पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करत आहेत.

‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या लढाऊ विमानावर पुन्हा लावण्यात आले श्री हनुमंताचे चित्र !

बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियातील सर्वांत मोठ्या ‘हवाई कवायतीं’च्या कार्यक्रमात ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या अर्थात् ‘हॉल’च्या लढाऊ विमानावर पुन्हा श्री हनुमंताचे चित्र लावल्याचे दिसून आले.

शिवजयंती निमित्त शहापूर येथे कवी संमेलनाचे आयोजन

शहापूर येथील जनक्रांती संघटना ,ग्रामसाप, साप्ताहिक शिवमार्ग आणि लोक हिंद चॅनेलच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शिवजयंती निमित्ताने “प्रिय शिवबास…”या नावाने काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘भजनास आमंत्रित गायक कट्टर हिंदु असल्याने हिंसा करू !’ – खलिस्तानवादी, ऑस्ट्रेलिया

मेलबर्न येथे गेल्या काही आठवड्यांत ऑस्ट्रेलियातील ३ हिंदु मंदिरांवरील आक्रमणांच्या घटना समोर आल्यानंतर आता येथील काली माता मंदिरातील महिला पुजार्‍याला धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे.

विनामूल्य मिळणार्‍या पंचतत्त्वाची जपणूक करा ! – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

नाणीज क्षेत्री २ दिवस संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळा झाला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

बोरिवली येथील प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे महाशिवरात्रीचे आयोजन !

बोरीवली पश्चिम येथील प्रसिद्ध प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल !  – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.