मानवनिर्मित जंगलांची हानी करणार्यांना शिक्षा करण्याविषयीचे विधेयक लोकसभेत सादर
मानवनिर्मित जंगलांनाही सध्याच्या कायद्यांच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ८ फेब्रुवारीला लोकसभेत मांडले. देशभरात अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक वणवे लावून जंगले नष्ट केली जातात. त्यामुळे मानवनिर्मित जंगलांनाही कायद्याचा आधार असला पाहिजे.