पुणे – हिंदु धर्मरक्षणार्थ, तसेच वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी २६ नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथे १८ वे वारकरी अधिवेशन होत आहे. राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने होणारे हे अधिवेशन दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे घेण्यात येणार आहे, तरी अधिकाधिक वारकरी आणि भाविक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.