पिंपरी (पुणे) – धुळे जिल्ह्यातून पुणे येथे विक्रीसाठी आणलेला ५५ किलो गांजा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. या प्रकरणी नूरमहंमद पिंजारी या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून गांजा, मोटार, २ भ्रमणभाष असा ३२ लाख ९५ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |