मिहीर शहा आणि त्याचा चालक यांची अटक कायदेशीर !
वरळी अपघातप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती !
मुंबई – वरळी येथील अपघातप्रकरणी मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांना झालेली अटक कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने दोघांच्या अटकेला आव्हान देणार्या याचिका फेटाळून लावल्या.
मद्यधुंद पोलिसाच्या वाहनाच्या धडकेत शेतकर्यासह बैलांचा मृत्यू
भंडारा – सायंकाळी ६ वाजता शेताकडून बैलगाडीने घराकडे जाणार्या एका शेतकर्याला बैलगाडीसह एका मद्यधुंद पोलीस कर्मचार्याने चिरडले. यात शेतकर्यासह दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकर्यांनी पोलिसाला पुष्कळ मारहाण केली आणि तेथील महामार्ग अडवला. यानंतर बराच वेळ तणावाचे वातावरण होते. हिरालाल कांबळे (वय ५२ वर्षे) असे शेतकर्याचे नाव आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधीमंडळ नेत्यांची निवड !
मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित २० आमदारांची २५ नोव्हेंबर या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीमध्ये भास्कर जाधव यांच्याकडे गटनेता, आमदार सुनील प्रभु यांच्याकडे पक्षप्रतोद, तर आदित्य ठाकरे यांची विधीमंडळ सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. या वेळी पक्षाशी एकनिष्ठ रहाण्याचे शपथपत्र सर्व आमदारांकडून घेण्यात आले.
पिंपरी (पुणे) येथे वाहतूक पोलिसांना मारहाण करणार्या तरुणावर गुन्हा नोंद !
पिंपरी (पुणे) – दुचाकीवरून जाणार्या ३ तरुणांना वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यातील हर्षवर्धन कदम याने पोलिसांवर अरेरावी करत मारहाण केली. ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गांवरील फुगेवाडी येथे घडली. या प्रकरणी हर्षवर्धन याच्यावर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसणे, हे कायदा-सुव्यवस्था धोक्यात असल्याचे लक्षण आहे ! अशांना पोलिसांनी वेळीच वठणीवर आणणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिका : पोलिसांवर धर्मांध आणि अन्य तरुण यांची वाढती आक्रमणे कायदा-सुव्यवस्थेला घातकच !