विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे महाअभिषेक; गोरक्षकांचे सत्कार !

कोल्हापूर – विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे भजन, जागर, महाअभिषेक, गोरक्षकांचे सत्कार, असे विविध कार्यक्रम पार पडले. समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे महाराज (देहू आळंदी) यांचे व्याख्यान झाले, तसेच महाआरती होऊन सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

या प्रसंगी विश्व हिंदु परिषदचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, अध्यक्ष श्री. कुंदन पाटील, बजरंग दल जिल्हा संयोजक श्री. सुरेश रोकडे, शहर संयोजक श्री. पराग फडणीस, सहसंयोजक श्री. अक्षय ओतारी यांसह सर्वश्री राजू गडकरी, सचिन मांगलेकर, गणेश बुगले, नीलेश पाटील, विशाल परीट यांसह अन्य उपस्थित होते.