नाशिक – येत्या पंधरा दिवसांच्या आत भगुरला अधिकृतरित्या पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. येथे ‘थीम पार्क’ आणि संग्रहालयासाठी पाच कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वेळी केली.
सौजन्य झी 24 तास
स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागाद्वारे आयोजित पदयात्रा आणि अभिवादन कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी ही घोषणा केली.
या वेळी ते म्हणाले की, सावरकर यांचा वाडा बघून एक ऊर्जा मिळाली. भगुर एक तीर्थस्थान झाले आहे. सावरकर हिंदूसंघटक होते. त्यांनी सामाजिक उत्थानासाठीही प्रयत्न केले. त्यांचे विचार जगभरात पोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सावरकर यांचा वाडा, त्यांची शाळा यांतही सुधारणा होईल. हे सावरकरांच्या विचारांचे सरकार असून आम्ही सर्व जण त्यांचे मावळे आहोत. येथील सर्व विकासकामांची समयमर्यादा मे २०२४ ठेवली आहे.