फरीदाबाद आणि मथुरा येथील ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर आणि ग्रेटर फरीदाबाद येथील एस्.आर्.एस्. रेसिडेन्सी सेक्टर ८८ मधील शिवमंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद

सनातन संस्थेचा उद्देश ऐकून अनेक जिज्ञासू प्रभावित झाले. त्यांनी ‘सनातनचे कार्य  अतिशय चांगले असून ते हिंदु धर्मासाठी आवश्यक आहे’, असे सांगितले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या ‘ऑनलाईन’ नामजप सोहळ्यांत जिज्ञासूंनी अनुभवले भगवान शिवाचे अस्तित्व !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ‘ऑनलाईन’ नामजप सोहळ्यांमध्ये ‘ॐ नम: शिवाय ।’चा गजर ! उत्स्फूर्त प्रतिसाद !

केरळमध्ये ‘नमः शिवाय’ ऑनलाईन सामूहिक नामजप पार पडला भावपूर्ण वातावरणात !

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी, म्हणजेच ११ मार्च या दिवशी ‘नमः शिवाय’ हा सामूहिक नामजप हिंदी आणि मल्याळम् भाषेत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या दोन्ही भाषांतील कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिवशंभो, तवकृपे सत्वर घडो युगपरिवर्तन !

सुरा-सुर लढा चाले युगानुयुगे ।
असुरी प्रवृत्ती बोकाळल्या कलियुगे ॥
सत् प्रवृत्तीचे करून रक्षण ।
असुरी प्रवृत्तींचे करण्या निर्दालन ॥

पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरातील शिवशक्ती यागाची आज सांगता

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वराच्या महाशिवरात्री उत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अधीन राहून मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमांसह सुंदर सजावट !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांसह शेवंती आणि बेल पत्रांची सुंदर सजावट करण्यात आली होती. श्री. अनंत कटप या भाविकाच्या वतीने ही सजावट करण्यात आली होती. 

शिवाचे ‘अर्धनारी नटेश्‍वरा’च्या रूपात झालेले दर्शन आणि शिवाच्या प्रेरणेने ‘अर्धनारी नटेश्‍वरा’चे सुंदर चित्र रेखाटतांना आलेली अनुभूती

निःशब्द तू, निरंकार तू । निर्विकार तू, निरंजन तू ।
असे असूनही चराचरांत व्यापून उरलेला । शिवस्वरूप अर्धनारेश्‍वर तू ॥

‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करतांना आणि केल्यानंतर कु. स्मितल भुजले हिला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपामुळे मनाला शांती वाटून सभोवताली एक पोकळी असल्याचे जाणवणे आणि स्वतःही पोकळी असून शिवच सर्व करत असल्याची अनुभूती येणे