इराकमधील एक जरी अमेरिकी नागरिक ठार झाला, तर इराणवर सैन्य कारवाई करू !

भारताने इतक्या वर्षांत पाकला कधी अशी चेतावणी दिली आहे का ? अमेरिकेप्रमाणे भारत वागला असता, तर जिहादी आतंकवाद आणि पाक या दोन्ही समस्या कायमच्या सुटल्या असत्या !

पाकिस्तानी सैन्याच्या बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

बलुचिस्तानसाठी लढणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. पत्रकार साजिद हुसैन यांचा ही असाच मृत्यू झाला होता !

भारताविरोधातील आक्रमकता थांबवण्याचा अमेरिकेचा चीनला सल्ला

अमेरिकेच्या संसदेने संरक्षण धोरण विधेयक संमत केले असून यात चीनी सरकारकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ भारताविरोधात चालू असलेली सैन्याची आक्रमकता संपवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

‘कर्मचार्‍यांवर आक्रमण होण्याच्या भीतीमुळे फेसबूकची मवाळ भूमिका !’ – अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा थयथयाट !

हिंदूंच्या संघटनांना ‘हिंसक’ ठरवण्याच्या केलेल्या या प्रयत्नांवरून भारत सरकारने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’वर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! भारतात अशा दैनिकांच्या विक्रीवर आणि संकेस्थळावर बंदी घातली पाहिजे !

न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेरील गर्दीवर अंदाधुंद गोळीबार : जीवितहानी नाही !

येथील मॅनहटन भागातील एका चर्चबाहेर आयोजित कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कुणीही घायाळ झाले नाही.

‘फायझर’ने भारताकडे मागितली कोरोनावरील लसीची विक्री करण्याची अनुमती !

अशी मागणी करणारे ‘फायझर’ हे पहिले औषधनिर्मिती करणारे आस्थापन ठरले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश सरकारने तसेच बहारीनमध्येही ही लस वापरण्यास संमती देण्यात आली आहे.

अंतर्गत प्रकरणांत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका ! – भारताची कॅनडाच्या पंतप्रधानांना समज

कॅनडामध्ये मोठ्या संख्येने शीख धर्मीय रहातात आणि देहली येथे आंदोलन करणारे शेतकरी मोठ्या संख्येने शीख असल्याने ट्रुडो यांनी मतांच्या लांगूलचालनासाठीच या आंदोलनावर भाष्य केल्याचे लक्षात येते !

लडाखमधील चीनचे बांधकाम ही चिथावणीखोर कृती ! – अमेरिकी सिनेटर राजा कृष्णमूर्ती यांची टीका

अमेरिकेचे सिनेटर असे उघडपणे बोलतात; मात्र भारतातील खासदार असे बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत !

अमेरिकेतील निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आता ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनीही केला आरोप

नोव्हेंबर मासाच्या आरंभी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी केला आहे.

अफगाणींची खदखद

भारताच्या शेजारी पाक आणि चीन यांसारखे मोठे शत्रू आहेत. अशा वेळी भारताला अफगाणिस्तानमध्ये हातपाय पसरण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अफगाण सरकारला पाकही त्यांचा शत्रू वाटतो. सरकारने प्रबळ इच्छाशक्ती दाखवून पाकपुरस्कृत आतंकवाद संपवून अफगाणिस्तानात झेप घ्यावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !