उच्चशिक्षित आणि प्रगत समाज (?) असणार्या अमेरिकेतील समाजजीवन किती खालावले आहे, हेच यातून दिसून येते !
न्यूयॉर्क – अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बंदुकांची विक्री होत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. ‘नॅशनल आफ्रिकन अमेरिकन गन असोसिएशन’चे संस्थापक फिलिप स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार ‘समाजात होणार्या गोळीबाराच्या घटनांनी लोकांना बंदुका घेण्यास उद्युक्त केले आहे. स्वत:ला आणि कुटुंबाला कसे वाचवता येईल याचा लोक गंभीरपणे विचार करत आहेत.’
जानेवारी २०२१ मध्ये एफ्.बी.आय.कडे ४३ लाख खरेदीदारांचे पडताळणीसाठी अर्ज आले होते, तर जानेवारी २०२० मध्ये ही संख्या २७ लाख होती. अमेरिकेच्या घटनेच्या दुसर्या दुरुस्तीमुळे येथील लोकांना शस्त्र ठेवण्याचा अधिकार आहे. येथे १० पैकी ३ तरुणांकडे स्वत:ची बंदूक आहे.
वाचा संपादकीय : जीवघेणी संस्कृती !