भारताचा जीडीपी १२.५ टक्के होण्याची शक्यता ! – जागतिक नाणेनिधीचा अंदाज

चीनपेक्षा भारत चांगली कामगिरी करील !

नवी देहली – कोरोना संकटामुळे वर्ष २०२० मध्ये भारताचा ‘जीडीपी’ (सकल राष्ट्रीय उत्पन्न) उणे ८ टक्क्यांंपर्यंत घसरला होता; मात्र उद्योगधंदे हळूहळू सावरत असून जीडीपी वेगवान होऊन भारत वर्ष २०२१ मध्ये चीनच्या तुलनेत उत्तम कामगिरी करील. भारताचा विकासदर विक्रमी म्हणजे १२.५ टक्के इतका असेल, असे जागतिक नाणेनिधीने तिच्या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०२२ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी  वृद्धींगत होईल, असेही नाणेनिधीने यात म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर १०.५ टक्के रहाण्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लावण्याकरता रिझर्व्ह बँक कायमच सिद्ध आहे.