अमेरिकेत मॉलमधील गोळीबारात ८ जण घायाळ

अमेरिकेतील विस्कॉन्सिन भागातील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात एका लहान मुलासह ८ जण घायाळ झाले असून पोलीस गोळीबार करणार्‍याचा शोध घेत आहेत.

मुसलमानविरोधी भावना वाढेल; म्हणून २६/११ च्या आक्रमणानंतर काँग्रेस सरकारने पाकवर आक्रमण केले नाही ! – बराक ओबामा यांचा गौप्यस्फोट

काँग्रेस हा देशाला मिळालेला शाप आहे, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये, इतकी हानी काँग्रेसमुळे या देशाची स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्वी गांधी यांनी केली आहे !

अशा काँग्रेसवर बंदी घाला !

देशात मुसलमानविरोधी भावना वाढेल, यामुळे २६/११ च्या मुंबईवरील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पाकवर आक्रमण करणे टाळले, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे.

लहानपणी रामायण आणि महाभारत यांतील कथा ऐकायचो ! – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

कालमहिम्यानुसार येणार्‍या काळात हिंदु धर्माचा जगभरात प्रसार होणार असून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. मुसलमान असूनही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी असे वक्तव्य करणे, हे त्याचेच द्योतक होत !

आवश्यकता वाटल्यास अमेरिकेतील अन्य ठिकाणचे चिनी दूतावासही बंद केले जाऊ शकतात ! – ट्रम्प यांची चेतावणी

जर आवश्यकता भासली, तर चीनचे अमेरिकेतील अन्य ठिकाणचे दूतावासही बंद करण्यात येऊ शकतात, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

अभिनेते अरुण गोविल यांना श्रीरामाच्या वेशभूषेत स्टुडियोमध्ये परेड करण्याचा बीबीसीचा प्रस्ताव निर्माते रामानंद सागर यांनी फेटाळला होता ! – प्रेम सागर यांचा दावा

बीबीसीचा आतापर्यंतचा इतिहास हा हिंदुद्वेषीच आहे. त्यामुळे श्रीरामाच्या वेशभूषेतील कलाकाराला अशा प्रकारे परेड करायला लावून बीबीसीला हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवायची होती. अशा मोठ्या विदेशी वाहिन्याच्या दबावाला बळी न पडणारे रामानंद सागर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे !

जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाकडून अमेरिका आणि कॅनडा देशांमध्ये बेबी पावडरची विक्री बंद

पावडरमुळे कर्करोग होत असल्यामुळे अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाच्या विरोधात अनेकांनी खटले प्रविष्ट केले. ते ग्राह्य धरून तेथील न्यायालयाने तिला दंड ठोठावला होता. जागतिक स्तरावर या आस्थापनाला विरोध असतांना आता भारत सरकारनेही या आस्थापनावर भारतात बंदी घालणे आवश्यक !

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवणार्‍यांना ‘आतंकवादी’ ठरवणार !

अमेरिकेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता नवा नियम लागू केला आहे. अमेरिका ज्या प्रमाणे याकडे गांभीर्याने पहाता आहे, ते पहाता भारतियांनी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे !

कोरोनामुळे अमेरिकेत होऊ शकतो ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू ! – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर कोरोनाचे केंद्र बनले आहे. प्रतिदिन येथे बाधित आणि मृत्यू झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

भारतात अडकलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना ‘एअरलिफ्ट’ करणार ! – अमेरिका

भारतात दळणवळण बंदी घोषित झाल्यानंतर भारतातून विदेशात जाणार्‍या विमानांची उड्डाणेे रहित करण्यात आली आहेत. त्यामुळे नवी देहली, मुंबई यांसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अमेरिकी नागरिक अडकले आहेत.