लाल समुद्रातील हुती आतंकवाद्यांचे वादळ आणि भारताची भूमिका ! 

१९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी लाल समुद्रात हुती आतंकवाद्यांकडून व्यावसायिक जहाजाच्या अपहरणासह एका वादळाला प्रारंभ झाला. मागच्या अडीच मासांत २ डझनांहून अधिक जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमणे झाली आहेत.

Indian Navy Saved Merchant Ship : भारतीय युद्धनौकेने व्यापारी नौकेला वाचवले !

एडनच्या आखातातील व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण

धोकादायक असलेल्‍या लाल समुद्रात भारतीय नौदल !

येमेनधील हुती बंडखोरांनी हमासमध्‍ये झालेल्‍या आक्रमणानंतर इस्रायलच्‍या विरोधात घेतलेल्‍या भूमिकेमुळे लाल समुद्रातील नौकांच्‍या रहदारीला गंभीर धोका निर्माण झाला आहे.राष्‍ट्राच्‍या भरभराटीसाठी व नैसर्गिक स्त्रोतांच्या उपलब्धतेकरिता लाल समुद्रात नौदलाची नियुक्‍ती हा शेवटचा पर्याय आहे.

महिलांना सैन्याप्रमाणे तटरक्षक दलात पुरुषांच्या बरोबरीने का मानले जात नाही ? – सर्वोच्च न्यायालय

भारतीय तटरक्षक दलात महिलांना ‘कमिशन्ड ऑफीसर’ पद न दिल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. कमिशन्ड ऑफिसर हा सशस्त्र पदाचा सदस्य असतो. त्याला काही महत्त्वाचे अधिकार असतात. महिलांना तटरक्षक दलात हे पद न मिळाल्याने या अधिकारांना ते मुकतात.

भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या सैन्य अभ्यासात ५१ देशांचे नौदल सहभागी !

भारतीय नौदलाने १९ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम् येथे ‘मिलन-२४’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांत मोठा सैन्य अभ्यास चालू केला आहे. यामध्ये ५१ देशांचे नौदल सहभागी झाले आहे.

Qatar Released Navy Officials : कतारने केली भारताच्या ८ निवृत्त नौदल अधिकार्‍यांची सुटका !

भारताच्या कूटनीतीचा विजय ! कथित हेरगिरीच्या आरोपावरून ठोठावण्यात आली होती फाशीची शिक्षा ! भारताने असाच प्रयत्न पाकिस्तानने अटक केलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठीही करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !

India Dedicated Dock Zone : भारताला ओमानच्या दुक्म बंदरात थेट प्रवेश करण्याची अनुमती !

सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या ओमानमधील दुक्म बंदरात भारताला थेट प्रवेश देण्यास ओमान सरकारने अनुमती दिली आहे. यामुळे भारताला पर्शियन गल्फमधून व्यापार करणे सुलभ जाईल, अशी अपेक्षा आहे.

भारतीय नौदलाने २ मासांमध्ये नौकांवरील १७ आक्रमणे रोखली ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

गेल्या २ मासांपासून लाल समुद्र आणि अरबी समुद्र यांसह या संपूर्ण मार्गामध्ये भारतीय नौदलाने १७ नौकांची समुद्री दरोडेखोरांपासून सुटका केली. या संदर्भात परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, आपल्यासोबत वाईट गोष्टी घडत राहिल्या, तर ‘त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही’, असे आपण म्हणू शकत नाही.

Srilanka Fishermen Arrested : श्रीलंकेने केली २३ भारतीय मासेमारांना अटक !

सरकारने भारतीय मासेमारांना भारतीय सागरी सीमा लक्षात येऊन ते तिचे उल्लंघन करणार नाहीत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

समुद्री दरोडेखोरांना खपवून घेतले जाणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारतीय नौदल इतके सशक्त झाले आहे की, आपण हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रांत सुरक्षेच्या संदर्भात पहिल्या स्थानावर पोचलो आहोत.