अरुणाचल प्रदेश भारतामध्ये दाखवणारे चीनच्याच आस्थापनाने बनवलेले ३० सहस्र नकाशे चीनकडून नष्ट

कुठे भारताचा भूभाग स्वतःचा आहे असे म्हणत नकाशे जाळणारा चीन, तर कुठे भारताचा भाग असतांनाही पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन यांना पाक आणि चीनमध्ये दाखवणार्‍या नकाशांवर कारवाई न करणारा भारत !

अलीगड मुस्लिम विद्यापिठातील नकाशात काश्मीर स्वतंत्र, तर अरुणाचल प्रदेश चीनमध्ये !

अलीगड मुस्लिम विद्यापिठात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या एका फलकावर भारताचा नकाशा दाखवण्यात आला असून त्यात काश्मीर स्वतंत्र दाखवण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर अरुणाचल प्रदेशही चीनमध्ये दाखवण्यात आला आहे.

सरकार अशा विद्यापिठांवर बंदी का घालत नाही ?

उत्तरप्रदेशमधील अलीगड मुस्लिम विद्यापिठात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या ‘होर्डिंग’वर भारताचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये काश्मीर स्वतंत्र, तर अरुणाचल प्रदेश चीनमध्ये दाखवण्यात आला आहे.

उत्तरप्रदेश की अलीगढ मुुस्लिम यूनिवर्सिटी में एक कार्यक्रम के होर्डिंग पर कश्मीर को भारत से अलग दिखाया गया !

ऐसी यूनिवर्सिटी पर सरकार रोक क्यों नहीं लगाती ?

काँग्रेसकडून काश्मीरविना भारताचा नकाशा प्रसारित : गुन्हा नोंद !

भारताचा नकाशा काश्मीरविना प्रसारित केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड भाजपने काँग्रेसच्या विरोधात तक्रार दाखल प्रविष्ट केली.

‘नमस्ते इंग्लंड’ चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध !

आज भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून अभिनेते अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रदर्शित करण्यात आले.

‘गुगल मॅप’वर मुंबईतील ठिकाणांच्या इंग्रजी नावांचे हास्यास्पद मराठीकरण

‘गुगल मॅप’वर विविध ठिकाणांच्या इंग्रजी नावांचे मराठीत भाषांतर करतांना अनेक चुकीचे उच्चार करण्यात आले आहेत. हे उच्चार अतिशय हास्यास्पद आहेत.

‘अ‍ॅमेझॉन’वर काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश नसलेल्या भारताच्या नकाशाची विक्री

ऑनलाईन साहित्यांची विक्री करणारे संकेतस्थळ ‘अ‍ॅमेझॉन’ने पृथ्वीचा नकाशा विक्रीस ठेवला आहे; मात्र यातील भारताच्या नकाशात काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भाग दाखवण्यात आलेला नाही.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या शिक्षक संघटनेने काढलेल्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर पाकचा, तर अरुणाचल प्रदेश चीनचा भाग

बंगालच्या टीएम्सी (तृणमूल काँग्रेस) टीचर्स असोसिएशनने परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये काश्मीर हा पाकिस्तानचा आणि अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग दाखवला आहे, असे भाजपने म्हटले आहे.

‘गियर बेस्ट’ आस्थापनाने त्याच्या फेसबूक खात्यावर काश्मीर नसलेले भारताचे मानचित्र हटवले

गियर बेस्ट नावाची इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणार्‍या आस्थापनाने तिच्या फेसबूक खात्यावर प्रोफाईल चित्र म्हणून भारताचे मानचित्र ठेवले आहे; मात्र या मानचित्रात काश्मीरला दर्शवण्यात आलेेले नाही. कायदेशीरदृष्ट्या हा गुन्हा आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे.


Multi Language |Offline reading | PDF