पाकिस्तानमध्ये शिखांना ठार मारण्याची धर्मांध मुसलमानांची धमकी !

खलिस्तानची मागणी करणारे याविषयी तोंड उघडतील का ? कॅनडातून हिंदूंना हाकलण्याची धमकी देणारे खलिस्तानी पाकच्या विरोधात का बोलत नाहीत ?

परराष्ट्रमंत्र्यांनंतर चीनचे संरक्षणमंत्रीही बेपत्ता !

यापूर्वी चीनच्या सैन्याच्या ‘रॉकेट फोर्स’चे प्रमुखही बेपत्ता झाले होते.

भारताने गेल्या ६ वर्षांत ८० देशांना १६ सहस्र कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची केली विक्री !

केंद्रशासनाने वर्ष २०२५ पर्यंत १४ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. ५ वर्षांत ३५ सहस्र कोटी रुपयांच्या निर्यातीची सिद्धता केली आहे.

भारतापासून रक्षण होण्यासाठी  चीन अक्साई चीनमध्ये बनवत आहे बोगदे !

अक्साई चीन भारताचा भाग असून चीनने त्याच्यावर नियंत्रण मिळवले आहे. अक्साई चीन पुन्हा भारतात समाविष्ट करण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत !

गणेशोत्सवात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याने हिंदूंचे सण आणि उत्सव आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करण्याची लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपमधील ग्रीस देशाच्या दौर्‍यावर !

४० वर्षांनंतर ग्रीसला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान !
ग्रीस भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याची शक्यता !

नाशिक येथे ३ टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या !

तरुणींनो, टवाळखोरांच्या त्रासामुळे आयुष्य संपवण्यापेक्षा स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्यांना वेळीच प्रत्युत्तर द्या !

भारताने पाकच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला !

पाकचा आरोप; मात्र संरक्षण मंत्रालयाकडून खंडण

कर्नाटकमध्ये चाचणीच्या वेळी स्वदेशी बनावटीचे ‘तपस’ ड्रोन कोसळले !

‘अपघातामागील कारणांची चौकशी केली जात आहे’, अशी माहिती संरक्षण अधिकार्‍यांनी दिली.

मणीपूरमधून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेले २०० हून अधिक मैतेई राज्यात सुखरूप परतले !

या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.