Pahalgam Terror Attack : गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिका भारताला साहाय्य करणार ! – तुलसी गॅबार्ड

पहलगाम आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड

वॉशिंग्टन – पहलगाम आतंकवादी आक्रमणातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिका भारताला साहाय्य करणार आहे, अशी घोषणा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी केली आहे. ‘या भयावह जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर आम्ही भारतासोबत आहोत’, असेही त्यांनी म्हटले आहे.

पहलगाममध्ये जिहादी आतंकवाद्यांनी २६ हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या केली होती. ‘ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासाठी आम्ही मनापासून सहवेदना व्यक्त करीत आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि या भयावह आक्रमणासाठी उत्तरदायी असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ’, असे तुलसी गॅबार्ड यांनी त्यांच्या ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे.