पाकच्या उद्योगपतीने त्याच्या कर्मचार्‍यांना दिली बनावट कोरोना प्रतिबंधात्मक लस 

जसे पाकचे शासनकर्ते, तसेच त्याची जनता !

नवी देहली – पाकमधील उद्योगपती महंमद युसूफ अमदानी यांनी मेक्सिको येथील केम्पेश या शहरातील त्यांच्या कापडाच्या मिलमधील १ सहस्र कर्मचार्‍यांना कोरोनाची बनावट लस दिली. ‘रिफॉर्मा‘ नावाच्या वृत्तपत्रात याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे.

महंमद होंडुरासमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. त्यांनी रशियाहून स्पुटनिक ५ नावाची लस आयात केली होती. ही लस त्यांनी त्यांचे कर्मचारी आणि जवळचे लोक यांना दिली होती. या प्रकरणाची चौकशी चालू आहे आणि पोलीस युसूफ यांच्या शोधात आहेत. मेक्सिको प्रशासनाने शिल्लक राहिलेल्या लसी जप्त केल्या आहेत. लसीची छायाचित्रे, कंटेनरची संरचना आणि लेबल पाहिल्यावरच स्पष्ट होते की, ही बनावट लस आहे.