(म्हणे) ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर त्यात वाईट काय ?’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.

(म्‍हणे) ‘संभाजी भिडेंचे पाय तोडल्‍यास २ लाख रुपये देणार !’

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी  म. गांधी यांच्‍याविषयी अवमान करणारे वक्‍तव्‍य केल्‍याचा काँग्रेसने आरोप केला आहे. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करण्‍यासाठी एम्.आय.एम्. पक्षाचे शहराध्‍यक्ष फारुख शाब्‍दी यांच्‍या नेतृत्‍वाखाली निदर्शने करण्‍यात आली.

मुसलमान व्यापार्‍यांमुळे गौहत्तीमध्ये भाज्यांचे दर वाढले ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

‘मुख्यमंत्री सरमा जो दावा करत आहेत, तसा भाग देशातील अन्य ठिकाणी होत आहे का ?’, याची निश्‍चिती करण्याची आवश्यकता आहे ! तसे असेल, तर अशा व्यापार्‍यांवर कुणी बहिष्कार घालण्याचे आवाहन केले, तर आश्‍चर्य वाटू नये !

वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून ठाकरे गटाला १५ दिवसांत भूमिका सांगण्‍याचे आवाहन !

प्रकाश आंबेडकर एम्.आय.एम्.शी युती करणार असल्‍याचीही चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर त्‍यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

बुलढाणा येथे असदुद्दीन ओवैसी यांच्‍या भाषणाच्‍या वेळी औरंगजेबाच्‍या नावाच्‍या घोषणा !

ओवैसी यांच्‍या भाषणाच्‍या वेळी औरंगजेबाच्‍या समर्थनार्थ घोषणा देण्‍यात आल्‍या. ‘जबतक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरे नाम रहेगा ।’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.

सत्य सांगण्याचे काम आम्ही करत राहू ! – पू. कालीचरण महाराज

तुम्हाला बोलण्यापासून कुणी अडवले ?, कुणी निंदा कुणी वंदा कालीकीर्तनचा आमचा धंदा, सत्य सांगण्याचा आमचा धंदा आहे आणि आम्ही बोलत राहू. ‘भो-भो’ करण्याची काहींना सवय असते; मात्र आम्ही आमचे काम करत राहू.

काँग्रेसच्या बाबरी मशीद बांधण्याच्या आश्‍वासनाचे काय झाले ? – असदुद्दीन ओवैसी

भाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्‍या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ?

(म्हणे) ‘छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीत पोलिसांचा सहभाग !’ – खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

आता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ?

औरंगजेबाचे फलक फडकवणार्‍यांवर कारवाई करणार ! – मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप

औरंगजेबाचे उघडपणे होत असलेले उदात्तीकरण न दिसणारे पोलीस आंधळे आणि बहिरे आहेत का ? अशा कर्तव्‍यचुकार पोलिसांवरही तात्‍काळ कठोर कारवाई केली पाहिजे !

औरंगजेबाचे फलक फडकावून आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍यांवर कारवाई करू ! – चंद्रकांत पाटील, मंत्री

छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्’च्या उपोषणात औरंगजेबाचे फलक, तसेच आक्षेपार्ह वक्तव्यांद्वारे उदात्तीकरण !