विशाळगड अतिक्रमण हटवण्याच्या प्रकरणावरून अंबादास दानवे यांचे इम्तियाज जलील यांना खडेबोल !
मुंबई – जेव्हा देवगिरी गडातील भारतमाता मंदिरासह अन्य मंदिरात पूजा करणार्या कुटुंबांना ‘सरकारी फतवा’ काढून मज्जाव करण्यात आला, शेकडो वर्षांच्या परंपरेला खंडित करण्याचा डाव झाला, तेव्हा तुमचा कंठ का नाही फुटला ?, असे खडेबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘एम्.आय.एम्.’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांना ‘एक्स’वरून सुनावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी शिवभक्तांनी घरे आणि वाहने यांची तोडफोड केली. त्यावर जलील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
विशाळगडावरील अतिक्रमण स्वतः काढले असते, तर ते शहाणपणाचे ठरले असते ! – अंबादास दानवे
अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांना उद्देशून म्हटले, ‘‘विशाळगड हे नरवीरांच्या शौर्याचे प्रतीक आहे. कोंबड्या कापून खायची ती राजधानी नाही ! विशाळगडावर ज्यांचे अतिक्रमण आहे, मग ते कुणीही असोत, त्यांनी ते स्वतः काढून घेणेच शहाणपणाचे ठरणार आहे. सर्वधर्मसमभावाची शाल आपण लोकसभा निवडणुकीत घालून फिरला आहात. आता लोकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहनही करा.’’
(म्हणे) ‘गुंड येथे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करू शकतात !’ – इम्तियाज जलील
जलील म्हणाले की, या घटनेविषयी तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते आणि पक्ष पुन्हा गप्प राहिले आहेत. हा नवा भारत आहे. जिथे गुंड सोयीस्करपणे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करू शकतात आणि पोलीस मूक दर्शक बनले आहेत. (धर्मांधांनी दंगली घडवून हिंदूंच्या प्रार्थनास्थळांची तोडफोड करून हिंदु देवतांच्या मूर्तींची विटंबना करतात, तेव्हा जलील यांच्यासह पोलीस शांत असतात ! – संपादक) गुंडांनी मुसलमान महिला आणि मुले यांना त्यांच्या घरात बळजोरीने घुसून मारहाण केली. (सर्व घरातून पळून गेले होते, तर कोण कुणावर अत्याचार करणार ? महिलांवर अत्याचार करणे ही धर्मांधांची विकृती आहे. हिंदूंची नाही ! – संपादक) मुसलमान मतांच्या मोठ्या पाठिंब्याने अलीकडेच जे खासदार निवडून आले, ते आता अज्ञातवासात गेले आहेत.
संपादकीय भूमिकाज्यांच्या पूर्वजांनी हिंदूंची लक्षावधी प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली, त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का ? |