विरार – येथे २१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने ७ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. २३ एप्रिल या दिवशी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दांपत्य येथील इमारतीत २१ व्या मजल्यावर रहाते. त्यांचा ७ महिन्यांचा मुलगा व्रिशांक उपाख्य वेद याला पूजा कडेवर घेऊन घरात फिरत होत्या. त्यांनी खिडकी उघडी ठेवली होती. त्या खालील फरशी ओलसर असल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्या खिडकीच्या दिशेने पडल्या. त्यांच्या कडेवरील बाळ खाली पडले. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. सेदानी यांना विवाहाच्या ७ वर्षांनंतर मूल झाले होते.