‘एम्.आय.एम्.’चे माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरात आल्यास ‘कोल्हापुरी चपले’ने त्यांचे स्वागत ! – सकल हिंदू समाज

डावीकडून श्री. निरंजन शिंदे, श्री. अर्जुन आंबी, श्री. उदय भोसले, श्री. सुनील सामंत, श्री. गजानन तोडकर, श्री. शिवानंद स्वामी, श्री. दीपक देसाई आणि श्री. मनोहर सोरप

कोल्हापूर, १७ जुलै (वार्ता.) – सध्या महाराष्ट्रात अनेक धर्मांध सामाजिक माध्यमांवर ‘मिशन कोल्हापूर’ या नावाने मोहीम चालवत आहेत. यामुळे कोल्हापूर येथे अशांतता आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा कट रचला जात आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्व मुसलमान समाजातील लोकांना एकत्र करून १९ जुलैला ‘एम्.आय.एम्.’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापूर येथे मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. जलील कोल्हापूर येथे आल्यास ‘कोल्हापुरी चपले’ने त्यांचे स्वागत केले जाईल, अशी चेतावणी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू एकता कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर म्हणाले की, मोर्च्याच्या वेळी कोल्हापूर येथे चिथावणीखोर भाषणे आणि घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कोल्हापुरात सामाजिक शांततेला तडा गेल्यास याचे दायित्व मोर्चाचे आयोजक, पाठिंबा देणारी मंडळी, स्थानिक पातळीवरील नेते या सर्वांचे असेल. जलील यांनी कोल्हापूर येथे येणे रहित न केल्यास ‘कोल्हापूर बंद’चे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून केले जाईल.

विशाळगड येथे काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी अल्पसंख्य समाजातील लहान मुलीला स्वत:चे जॅकेट काढून दिले. गतवर्षी दसरा चौकात लहान मुलांच्या सहल नेणार्‍या बसवर धर्मांधांकडून दगडफेक होऊन ती मुले जेव्हा घायाळ झाली, तेव्हा त्यांच्यापैकी एकाही मुलाची शाहू महाराज यांनी चौकशी का केली नाही ? तेव्हा एकाही मुलाला जॅकेट का द्यावेसे वाटले नाही ? हा प्रकार मतांच्या लाचारीपोटीच केला गेला, असेच म्हणावे लागेल.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, श्री. अभिजित पाटील, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, शिवाजी पेठ येथील श्री. विशाल बोंगाळे, हिंदू महासेभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. नंदकुमार घोरपडे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.