आतंकवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्या !

मृतांच्या कुटुंबियांची मागणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

डोंबिवली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात ठार झालेले डोंबिवली येथील अतुल मोने, त्यांचे नातेवाईक हेमंत जोशी आणि संजय लेले यांच्या कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी तिघांच्याही कुटुंबियांनी ‘सर्व आतंकवाद्यांना ठार करा, ‘शूट ॲट साईट’चे (दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे) आदेश द्या’, अशी मागणी केली आहे.