Balochistan Pakistani Soldiers Killed : बलुचिस्तानमध्ये बंडखोरांच्या आक्रमणात ४ पाकिस्तानी सैनिक ठार

इस्लामाबाद – बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथील मार्गट तपासणी नाक्यावर एका वाहनाजवळ झालेल्या शक्तीशाली स्फोटात ४ पाकिस्तानी सैनिक ठार, तर ३ जण घायाळ झाले. या आक्रमणामागे बलुच बंडखोरांचा हात असल्याचे म्हटले जात आहे.

१. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्‍या बलुची बंडखोरांनी या वर्षाच्या आरंभीपासूनच पाकिस्तानी सैन्यावर प्राणघातक आक्रमणे केली आहेत. यात मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

२. २४ एप्रिल या दिवशी खैबर पख्तूनख्वा प्रांतातही बलुची बंडखोरांनी असेच आक्रमण केले होते. बंडखोरांनी येथील बन्नू मिरनशाह मार्गावरील पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य केले. या वेळी त्यांनी केलेल्या स्फोटात २ पोलीस घायाळ झाले होते.

३. मार्च २०२४ मध्ये ‘बलुच लिबरेशन आर्मी’ या फुटीरतावादी संघटनेने केलेल्या सर्वांत मोठ्या आक्रमणात १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा बलुची बंडखोरांनी केला होता.