छत्रपती संभाजीनगर येथे निदर्शने, मालेगावमध्ये मोर्चा !

छत्रपती संभाजीनगर, २४ एप्रिल (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे विविध संघटना आणि नागरिक यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली, तर जळगाव येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

संभाजीनगर येथे पाकिस्तानच्या विरोधातील फलक जाळतांना हिंदुत्वनिष्ठ

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोचल्यानंतर या ठिकाणी पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. या वेळी घोषणा देऊन पाकचा निषेध व्यक्त करण्यात आला.

मालेगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध केला. आंदोलकांनी पाकविरोधी घोषणा देत आतंकवाद्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारले. मालेगाव येथे बंद पाळण्यात आला.

हिंगोली येथे निदर्शने करतांना हिंदुत्वनिष्ठ

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे शिवसेनेच्या वतीने आतंकवाद्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. केंद्र सरकारने आता आतंकवाद्यांना धडा शिकवावा, अशी मागणी करण्यात आली. औंढा नागनाथ आणि कळमनुरी येथे शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

आज अमरावती शहर बंद !

अमरावती – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनाच्या वतीने २५ एप्रिल या दिवशी अमरावती शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. येथील राजकमल चौक येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना सकाळी १० वाजता आंदोलन करणार आहेत