American Diplomats N Anti-Modi Leaders : अमेरिकी मुत्सद्दी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधकांना का भेटतात ?

  • अमेरिकेची मुत्सद्देगिरी कि भारतविरोधी षड्यंत्र ?

  • भारताचे निवृत्त ब्रिगेडियर व्ही. महालिंगम् यांनी उपस्थित केला प्रश्‍न !

अमेरिकेच्या मंत्र्याने ओमर अब्दुल्ला यांची श्रीनगरमध्ये भेट घेतांना

नवी देहली : अमेरिकेचे(America) राजनैतिक अधिकारी मोदी(Modi) सरकारच्या विरोधकांच्या घेत असलेल्या भेटीची सामाजिक माध्यमांवर चर्चा चालू आहे. सैन्यदलाचे निवृत्त ब्रिगेडियर व्ही. महालिंगम् यांनी अमेरिकी राजनैतिक अधिकार्‍यांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीविषयी प्रश्‍न उपस्थित केला आहे. यामागे काही षड्यंत्र आहे का ?, असेही त्यांनी विचारले आहे.

अमेरिकेच्या मंत्र्याने ओमर अब्दुल्ला यांची श्रीनगरमध्ये, तर महावाणिज्य दूताने भाग्यनगरमध्ये घेतली ओवैसी यांची भेट !

निवृत्त ब्रिगेडियर व्ही. महालिंगम् यांनी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २६ ऑगस्ट या दिवशी श्रीनगरमधील गुपकर निवासस्थानी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांची अमेरिकेचे मंत्री ग्रॅहम मेयर, सचिव गॅरी पलगार्थ आणि राजकीय सल्लागार अभिराम यांच्यासह काही मुत्सद्दींनी भेट घेतली. असे म्हटले जाते की, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याने अमेरिकी मुत्सद्दींना जम्मू-काश्मीरसाठी अमेरिकेने प्रसारित केलेला प्रवास टाळण्याचा सल्ला मागे घेण्यास सांगितले. यासह जम्मू-काश्मीर आणि सर्वसाधारणपणे प्रदेशाशी संबंधित अनेक सूत्रांवर चर्चा झाली. अमेरिकेचे महावाणिज्य दूत जेनिफर लार्सन यांनी या महिन्याच्या प्रारंभी भाग्यनगर येथे एम्.आय.एम.चे अध्यक्ष असणारे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भेट घेतली होती. श्रीनगर आणि भाग्यनगर यांसारख्या संवेदनशील भागांत अमेरिकी मुत्सद्दी विरोधी नेत्यांना का भेटत आहेत ? यामागे काही छुपा उद्देश आहे का ?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

भारताचे निवृत्त ब्रिगेडियर व्ही. महालिंगम्

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील स्थिती पहाता अमेरिका, चीन आदी भारतविरोधी देश भारताला अस्थिर करण्यासाठी टपलेलेच आहेत. हे पहाता अमेरिकेचे मंत्री आणि मुत्सद्दी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन काय साध्य करू पहात आहेत ?, याची चौकशी करण्याची मागणी देशातील नागरिकांनी सरकारकडे केली पाहिजे !