दादर येथील आंदोलनात हिंदु जनजागृती समितीची मागणी

दादर (मुंबई) – भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने दादर (प.) रेल्वे स्थानकाजवळ येथे केलेल्या आंदोलनातून केली आहे. या आंदोलनात व्रजदल, मानव सेवा संघ, दादर व्यापारी संघ, भूमीपुत्र संघटना, भाजप, सनातन संस्था, हिंदु राष्ट्रसेना या संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
✊ Mumbai's Dadar ROARS with @HinduJagrutiOrg's demand: CRUSH jihadi terrorists & their Indian handlers with decisive military action!
The Pahalgam attack on Hindu tourists is YET ANOTHER brutal chapter in the ongoing genocide of Kashmiri Hindus!
Jai Hind 🇮🇳#GlobalTerrorist… pic.twitter.com/0rYM0pyDjT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2025
या आक्रमणात कोणत्या संघटना, नेते वा जिहादी आतंकवादी सहभागी आहेत, हे शोधून त्यांच्यावर आतंकवादविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून कायमचा धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे.
काश्मीर खोर्यामध्ये व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून अतिरेक्यांचा बीमोड करावा, ज्या परिसरातून सतत अतिरेकी आक्रमणे होत आहेत, तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत. काश्मीरमधील उरलेले हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदु पंडित यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.