तिरंगा फेरीत इस्‍लामी कट्टरतावाद्यांकडून ‘सर तन से जुदा’च्‍या घोषणा !

  • संभाजीनगर ते मुंबई फेरी काढली

  • पोलिसांशी गैरवर्तन केल्‍याने पोलिसांकडून लाठीमार

मुंबई – एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्‍तियाज जलील यांच्‍या नेतृत्‍वाखाली काढण्‍यात आलेल्‍या संभाजीनगर ते मुंबई तिरंगा फेरीत इस्‍लामी कट्टरतावाद्यांनी ‘सर तन से जुदा’च्‍या (शिर धडावेगळे करण्‍याच्‍या) घोषणा दिल्‍या. भाजपचे नेते नितेश राणे आणि महंत रामगिरी महाराज यांच्‍या विरोधात मुंबईच्‍या दिशेने ही रॅली काढण्‍यात आली होती. या वेळी धर्मांधांनी पोलिसांशी गैरवर्तन केले आणि वाद घातला. (पोलिसांसमवेत गैरवर्तन करण्‍याचे धर्मांधांचे धाडस होते, यावरूनच पोलिसांचा काही धाकच उरलेला नाही, हे दिसून येते ! – संपादक) त्‍यामुळे पोलिसांनी लाठीमार केला.

फेरीतील सहस्रो वाहनांवर हिरवे झेंडे फडकावलेले होते. ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) आणि ‘सर तन से जुदा’च्‍या घोषणा धर्मांध देत होते. हा जमाव रोखण्‍यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. फेरीमुळे मुंबईतील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे जिल्‍हा अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्‍या विनंतीनंतर फेरी पुन्‍हा छत्रपती संभाजीनगरच्‍या दिशेने वळवण्‍यात आली.

संपादकीय भूमिका

  • संभाजीनगर येथून मुंबईत येऊन तेथील वातावरण, तसेच कायदा-सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा प्रयत्न करणार्‍या जिहादी मानसिकतेच्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी !
  • इतर वेळी राज्‍यघटनेच्‍या गोष्‍टी सांगणार्‍या एम्.आय.एम्.ला त्‍याने आयोजित केलेल्‍या फेरीत अशा घोषणा दिल्‍या जातात, यावरून पक्षाचे खरे स्‍वारूप दिसून येते !