Pahalgam Terrorist’s Houses : पहलगाम आक्रमणातील आतंकवाद्यांची घरे पाडली !

घरांत शोध घेत असतांना झाले स्फोट

आतंकवादी आसिफ शेख व सुरक्षादलांनी पडलेले घर

त्राल (जम्मू-काश्मीर) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणातील आतंकवाद्यांचा शोध घेतला जात असतांना यात आक्रमणातील आतंकवादी आसिफ शेख आणि अनंतनाग येथील आदिल यांच्या घरांवर सुरक्षा दलांनी धाड टाकून शोधमोहीम चालू केली. या वेळी या घरांमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. त्यानंतर सुरक्षादलांनी ही घरे बुलडोझरद्वारे पाडली.

आतंकवाद्यांना शोधण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत २ सहस्र लोकांची चौकशी केली आहे. यासमवेतच अनेक लोकांना कह्यात घेण्यात आले आहे.