ज्ञानसूर्य तळपू दे !

वेदादी धर्मग्रंथांतील, तसेच रामायण आणि महाभारत यांतून उलगडणारे हिंदु धर्माचे ज्ञान हे यात शिकवले जाईल. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे या ज्ञानाचा व्यावहारिक आणि प्रायोगिक उपयोग शिकवला जाईल.

जीवनात ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग या सूत्रांचा स्वीकार करा ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

संयम, चिकाटी, धैर्य, शिस्तबद्धता, कामात झपाटणे, विश्‍लेषणात्मकता, संशोधनात्मक वृत्ती, प्रतिभा आणि वक्तृत्व या कलागुणांनी विद्यार्थ्यांनी जीवनात उतरायला हवे.

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.

जीवनाचे सार असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचा शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे आवश्यक ! – अभिनेत्री मौनी रॉय

एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीत केवळ एखाद-दुसरी व्यक्तीच श्रीमद्भगवद्गीतेविषयी अशी मागणी करतेे, हे लक्षात घ्या ! मुळात अशी मागणीही करावी लागण्याची आवश्यकता नाही. केंद्रातील सरकारनेच असा निर्णय घेतला पाहिजे होता, असे हिंदूंना वाटते !

रिझवी यांची भूमिका !

र एखाद्या पुस्तकामुळे समाजात तेढ उत्पन्न होत असेल, तर त्याविषयी कार्यवाही करणे, हे सरकारचे काम आहे. त्यामुळे सरकार याविषयी काही भूमिका घेणार का ? हे पहावे लागेल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु)डॉ. आठवले

धर्मग्रंथांनी गोसेवा आणि गोरक्षण यांना ‘पुण्यकर्म’ म्हटलेले असणे !

‘गावो विश्‍वस्त मातरः ।’ याचा अर्थ ‘गाय विश्‍वाची माता आहे.’ केवळ भारतीय आणि मनुष्य यांची नाही, तर संपूर्ण चराचर सृष्टीच्या मातेचा उच्च दर्जा वेदांनी गोमातेला दिला आहे.

गुरुचरित्रात सांगितलेले स्वयंपाकात गुळ घालण्याचे महत्त्व !

अनेक प्रयोगातून समजले गुळ हा अँटीफंगल (बुरशीविरोधी) आणि अँटीबॅक्टरियल (प्रतिजैविक) म्हणून काम करतो. ‘गुळाला हा गुणधर्म त्याच्यामध्ये असणार्‍या भरपूर प्रमाणातील ‘फॉस्फरस’ या मूलद्रव्यामुळे प्राप्त होतो’, हे स्व. राजीव दीक्षित यांनी निर्विवादपणे सिद्ध केले आहे.

रामचरितमानस आणि शिक्षा !

सध्याच्या कायदेप्रणालीने हिंदु धर्मग्रंथांचा उल्लेख निकाल देतांना करणे, ही धर्मग्रंथांची परिपूर्णता आणि कालातीतता स्पष्ट करते. या धर्मग्रंथांतील शिकवणुकीनुसार मानवजातीने आचरण केल्यास निश्‍चितपणे समष्टी हित जपले जाईलच, गुन्हेगारीही अल्प होईल, हे येथे लक्षात घ्यावे.