कोल्हापूर – ‘स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट’ उजळाईवाडी, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळ, तसेच धनदायी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता कार्यालयात ५ वे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर साहित्य संमेलन होत आहे. २४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता पहिले सत्र प्रारंभ होईल. दुपारच्या सत्रात ‘हिंदु मावळा’ आणि ‘हिंदु भूषण’ पुरस्कार वितरण करण्यात येईल, अशी माहिती हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप यांनी दिली आहे.
२५ फेब्रुवारीला विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. २६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ‘सावरकरांच्या साहित्यातील राष्ट्रभक्ती’ या विषयावर श्री. आनंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. नितीन वाडीकर असतील. दुपारी ३ वाजता सातारा येथील अधिवक्ता दत्ता सणस यांचे ‘सावरकरांचे अर्थशास्त्रविषयक विचार’ या विषयावर मार्गदर्शन होईल. यानंतर पुरस्कार वितरण आणि समारोप होईल. तरी या संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. गोपाळ कुलकर्णी, श्री. संजय कुलकर्णी आणि श्री. नितीन वाडीकर यांनी केले आहे.