Kolhapur Madrasa Demolished : अवैध मदरशाचे बांधकाम भुईसपाट !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !

२२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ घोषित करा !

श्रीराम हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. समस्त हिंदू श्रीरामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ मानतात. त्यामुळे समस्त हिंदूंच्या धारणेस अनुसरून हिंदु जनभावनांचा आदर राखण्यासाठी केंद्र सरकारने २२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ म्हणून घोषित करावा.

किकली (सातारा) येथे हिंदु महासभेच्या वतीने २१ आणि २२ जानेवारी या दिवशी भव्य कार्यक्रम !

अखिल भारत हिंदु महासभा आणि श्रीराम ध्यानमंदिर, किकली, जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ जानेवारी या दिवशी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीत पूजापाठ करण्याच्या याचिकेवर होणार सुनावणी

भारतात बहुतांश मशिदी या मंदिरे पाडून बांधण्यात आल्या आहेत. हिंदू वैध मार्गाने ही मंदिरे परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने याची नोंद घेऊन भारतातील अशा सर्वच मंदिरांची सूची करून ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

ताजमहाल परिसरात मुसलमान पर्यटकाने नमाजपठण केल्याने हिंदु महासभेकडून विरोध !

ताजमहाल हा हिंदूंचा वारसा आहे, हे पुरातत्व विभाग घोषित का करत नाही ?केंद्र सरकारने या संदर्भात पुढाकार घेऊन ताजमहालचे सत्य जगाला सांगितले पाहिजे !

विविध नेत्यांनी केलेल्या ‘हेट स्पीच’च्या विरोधात कोल्हापूर येथे ५० हिंदूंची तक्रार !

उदयनिधी स्टॅलीन, ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबरला ५० हिंदूंनी तक्रार दिली आहे.

सोलापूर येथे गरब्याच्या कार्यक्रमात हिंदू म्हणून घुसलेल्या ३ मुसलमान तरुणांना हिंदु संघटनेचा दणका !

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सतर्क असलेल्या सकल हिंदूसंघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! अशीच सतर्कता गरब्याचे आयोजन करणार्‍या प्रत्येक आयोजकाकडे असायला हवी, तरच हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होऊ शकेल !

मराठा आरक्षणासाठी हिंदु महासभेच्‍या राजेंद्र तोरस्‍कर यांचे बेमुदत उपोषण !

श्री. राजेंद्र  तोरस्‍कर म्‍हणाले, ‘‘मराठा समाजाची न्‍याय्‍य मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे.’’ या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्‍थित होते.

चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा ! – स्वामी चक्रपाणी महाराज, अध्यक्ष, हिंदु महासभा

भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.

विशाळगडावरील शेवटचे अतिक्रमण दूर होईपर्यंत हिंदुत्‍वनिष्‍ठ शांत बसणार नाहीत ! – नितीनराजे शिंदे, विशाळगडमुक्‍ती आंदोलन

विशाळगडावर मद्य-मांस बंदीच्‍या संदर्भातील आदेश यापूर्वीच निघाले असून ते आदेश कोणत्‍याही परिस्‍थितीत मागे घेण्‍यात येणार नाहीत, असे आश्‍वासन जिल्‍हाधिकार्‍यांनी शिष्‍टमंडळास दिले आहेत.